हा राजा प्रजेवर फार प्रेम करतो आहे, पांडवांचा नातू आहे, धर्मशील आहे, शुकाचार्य त्याठिकाणी महाराज या राज्याच्या समोर 'कथा' वर्णन करून सांगतात भगवंताची. याचा अर्थ राजाचा अधिकार सामान्य नाही. शुकाचार्य कोणाच्याही समोर भाळणार नाहीत. हा राजा सुद्धा 'दिव्य आत्मा' आहे. हा महात्मा आहे. हा राजर्षी आहे. एवढं दिव्यत्व आहे महाराज..!
म्हणून हा त्याठिकाणी एक दिवशी वनामधे विचरण करत असताना त्याला एक विलक्षण असणारी घटना दिसली. ती घटना अशी होती..! एक काळा कभिन्न असणारा राजबिंडा पुरुष तो त्याठिकाणी हातामधे चाबूक घेऊन एका बैलाला मारत होता आणि त्या बैला जवळ एक गोमाता त्याठिकाणी उभी होती. त्या बैलाच दुःखं पाहून ती गोमाता रडती आहे, दुःखी झालेली आहे. त्या गाय आणि बैलाच दुःखं पाहून राजा व्याकुळ झाला. माझ्या रांज्यामधे त्याठिकाणी असं घोर कृत्य घडतय. का मारतो आहे त्या बैलाला ? असा विचार करून त्याठिकाणी राजा परीक्षिती समोर आला आणि राज्याने त्या काळ्याकभिन्न असणाऱ्या पुरूषाला ललकारल. मुर्खा मारू नकोस..! त्यानं एवढं मारलं होतं त्या बैलाला त्याचे तीन पाय तोडून टाकले होते, एकच शिल्लक ठेवला होता. एकाच पायावर आहे तो बैल, व्याकूळ झालेला आहे, दुःखी आहे, त्याच्या जवळ असणारी गोमाता आणि ती त्याठिकाणी रडते आहे. ते दुःखं पाहून राजान त्या काळ्याकभिन्न पुरुषाला माझ्या माझ्याबरोबर युद्ध कर म्हणून सांगितलं. त्यानं युद्ध करायला सुरुवात केली., दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामधे राजा परीक्षित त्याठिकाणी त्या काळ्याकभिन्न पुरुषाला मारणार इतक्यात तो शरण आला, पायाच पडू लागला, राजा मारू नकोस. "क्षत्रियाचा धर्म" आहे शरण आलेल्यांना जीवेच मारायचं नाही. मी तुला शरण आलोय मला मारू नकोस. विचारलं कोण आहेस तू आणि का मारतो आहेस त्या बैलाला ? त्यानी सांगितलं माझं नाव आहे #____कली" मी "भगवंताचा भक्त" आहे. मी "वैष्णव" आहे. मला भगवंतान स्वतः इथे पाठवलंय. मग भगवंताच्या आज्ञेनच कलियुगाच त्याठिकाणी प्राकट्य झालं होतं. चार युगं आहेत ना महाराज. या चार युगामधे त्याठिकाणी हे कलियुग आहे आणि सर्वात श्रेष्ठ युग आहे असं आपण त्याठिकाणी ऐकलेल आहे, म्हणून असं असणार हे कलियुग. माझं प्राकट्य झालंय, हे माझं युग आहे मला मारू नकोस भगवंतांच्या आज्ञेच उल्लंघन होईल. मग तुला मारू नको मग तू का मारतो आहेस त्या बैलाला ? का त्याठिकाणी त्या गोमातेला त्रास देतो आहेस ? छळतो आहेस. तो बैल सामान्य नव्हता, तो बैल म्हणजे धर्म आहे 'मूर्तिमंत धर्म' अन ती गोमाता जी आहे ना सामान्य असणारी गाय नाही ती तर 'पृथ्वी' आहे. त्या धर्मावर झालेला अत्याचार पाहून पृथ्वीला वेदना होतायत आणि राजाचं कर्तव्य असतं महाराज, प्रत्येक राज्यान त्याठिकाणी "धर्म आणि धरती" तिचा सांभाळ केला पाहिजे. "धर्म आणि धरती" या दोघांचा सांभाळ करणं हे राजाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून धर्मही सांभाळला पाहिजे अन धरतिला पण सांभाळलं पाहिजे. दोघेही दुःखी आहेत.
राजान त्या काळ्याकभिन्न असणाऱ्या पुरुषाला बंदी करून टाकलं. धर्माला त्याठिकाणी मुक्त करून टाकलं, त्याचे तीन पाय त्याला प्राप्त करून दिले. धर्माला चार पाय असतात महाराज.
तपः शौचं दया सत्यं इति पादाः कृते कृतः।
हे चार पाय आहेत. पहिला पाय असतो तप: , तपश्चर्या करणं हा धर्म आहे. दुसरा पाय असतो शौचं, शुचिर्भूत राहणं हा धर्म आहे. तिसरा पाय असतो दया, हा धर्माचा पाय आहे आणि सत्य, पहिले तीन पाय जरी तोडले गेले तरी "सत्य" नावाचा पाय मात्र कोणाला तोडता येत नाही. कारण "सत्य आहे परमात्मा" परमात्म्याला कोण तोडील. जगामधे परमात्माच सत्य आहे. म्हणून जगातलं सगळं जरी संपलं तरी परमात्मा कधी संपत नाही. परमात्मा कालही आहे, परमात्मा आज आहे आणि परमात्मा त्याठिकाणी उद्या पण राहणार आहे, तो सत्य स्वरूप आहे. म्हणून सत्य नावाचा पाय त्याठिकाणी कोणी तोडू शकत नाही. धर्माला त्याचे तीन पाय मिळाले. "भगवती पृथ्वी" समाधानी झाली.
तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत राजा परिक्षितीच राज्य आहे तोपर्यंत कलियुगाचा प्रभाव चाललाच नाही तीस वर्षापर्यंत. तीस वर्ष असं वर्णन करून सांगतात. कलियुगाला सुरुवात झाली पण त्याच्या सुरुवातीची तीस वर्षे त्याला त्याची कोणत्या प्रकारची चाले चालता आली नाही. आता तो फोफावलेला आहे. नव्हे अजून त्याठिकाणी त्याचं प्रथम चरण आहे. तो तरुण आहे अत्ताशी, आता तो प्रौढ होणार आहे. तो अजून त्याठिकाणी कारस्थान करणार आहे. तो याच्यानंतर काय करील ते सांगता येत नाही. आपण संकल्प करताना म्हणतो ना, कलियुगे कली प्रथम चरणे, असं म्हटलं जातं ना. कलिच प्रथम चरण हे चालू आहे. म्हणजे अजून सुरुवातच आहे तरी एवढी दानादिन दिसती आहे डोळ्यासमोर, तर भविष्यात आणखी काय होईल सांगता येत नाही. ते पाहायला आपण राहणारही नाहीत अन राहु पण नये हा महत्वाचा विचार आहे. कली मोठा भयंकर आहे. म्हणून अशी परिस्थिती त्याठिकाणी या कलियुगाच्या प्रभावान होते.

बांधला गेला पाया पडू लागला, म्हटला मला बांधून टाकू नका, माझं युग आहे मला कुठेतरी राहायला जागा द्या. म्हणे राहायचं नाही चालता हो माझ्या रांज्यातून. म्हणे जाऊ कुठे ? तुम्ही आत्ताच त्याठिकाणी सार्वभौम राज्याची स्थापना केली, सगळ्या भूमंडलावर तुमचंच राज्य आहे एकछत्री राज्य. तुमचं राज्य नाही अशी जागाच नाही पृथ्वीवर कुठे. मी जावू कुठे मला सांगा ? मला थोडीशी जागा राहायला द्या, तुम्ही म्हणाल तिथे मी वास्तव्य करीन. राजान त्याठिकाणी महाराज त्याला चार स्थान दीली राहण्याची. ही चार स्थान म्हणजे,
द्युतं पानं स्रिया: सुनां यत्राधर्मश्चतुर्वीधः ।।
चार ठिकाणं आहेत. पहिलं ठिकाण आहे द्युतं, द्युत म्हणजे जुगार. जुगार, जुगार खेळण्यांमधे कली वास्तव्य करतो महाराज. माणसं मोकळी बसली की काही काम नाही टाईमपास करायचा मग ते जुगार खेळण्यांमध्ये त्याठिकाणी मस्त होतात. जुगार म्हणजे ते पत्ते खेळतात ना लोकं, त्यालाच जुगार म्हणायचं. पूर्वीच्या काळात वेगळा प्रकार असेल कदाचित. आता दिसतो तो मात्र हाच आहे.

काही लोक म्हणतात आम्ही काय पैसे खर्च करून खेळतो का ? आम्ही टाईमपास म्हणून खेळतो. अरे टाईमपास म्हटलं तरी जुगारच आहे त्याच्यातून कली कसा प्रवेश करिल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की पास करण्याइतका टाईम आपल्याकडे आहे कुठे ? देवान त्याठिकाणी छोटस आयुष्य आपल्याला दिलंय, या आयुष्यामधे त्याठिकाणी भगवंताच भजन करावं ते आयुष्य कमी वाटतं. साधुसंतांना हे आयुष्य कमी वाटतं म्हणून तर परत म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा । कालच हे म्हणत होते परत जन्म घेईन आणि जन्म घेऊन त्याठिकाणी पुन्हा त्याठिकाणी भगवंताची भक्ती करण्याकरिता येईन. कारण ते अवीट असणार, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे । आम्हा जन्म घेणे युगा युगी ॥
युगा युगात जन्म घ्यायचाय आणि भगवंताची भक्ती करायची आहे. म्हणून हा वेळ कमी वाटतो आहे अजून त्याठिकाणी जन्म घेऊन भगवंताच भजन करावसं वाटतं, लोक टाइमपास करण्याचा विचार करतात. म्हणून टाईमपास म्हणून सुद्धा जुगार खेळायची नाही, ती वाईटच आहे. त्याच्यातून कली त्याठिकाणी प्रवेश करतो बुद्धी मलीन होते आणि त्या माध्यमातून कली त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून 'द्युत' हे कलिच त्याठिकाणी राहण्याचं स्थान आहे.

त्याच्यापुढे त्याठिकाणी वर्णन करून सांगतात "पानं" म्हणजे 'मद्यपान' मद्यामधे कली वास्तव्य करतो, म्हणून त्याठिकाणी मद्यपान वर्जित आहे. मद्यपान करणाऱ्या माणसाला महापापी म्हटलं जातं आणि त्याला नरकात जाऊन पडावं लागतं असं त्याठिकाणी वर्णन आहे महाराज. म्हणून तर त्याठिकाणी पंच महापातक सांगितली ना त्याच्यामधे हे पंच पातक आहे.
ब्रह्महत्या सुरापान स्तयं गुर्वग्ड़नागमः ।
महन्ति पातकान्याहुः ससर्गश्चापि ते: सह ।।
हे पाच महापातक आहेत. यांना महापाप म्हणतात, ही नरकात नेण्याची साधन आहेत.
द्युतंच मद्यंच पिशीतंच्य वैश्या । पापर्दि चौर्यम परदार सेवा । येता नी सप्त व्यसनानी लोके । घोराति घोरम नरके नियंती ॥
सात व्यसण आहेत महाराज. द्युतंच मद्यंच पिशीतंच वैश्या. द्युत म्हणजे जुगार, मद्य म्हणजे दारू पिशीत म्हणजे मांस, हे मांस त्याठिकाणी लोकं खातात ना त्यांच्याकरिता स्वतंत्र तरतूद आहे. त्यांच्याकरता नरकात त्याठिकाणी त्याला स्थान प्राप्त होतं. लोकांना हे समजत नाही, लोकं आज त्याला मानायला तयार नाहीत. नाही मानलं तरी भोगायचं काही बंद होईल का ? तो भोक काय आल्याशिवाय राहील का ? आज नाही त्याठिकाणी लोकं ऐकत, नाही ऐकलं तरी चालेल, जेव्हा ते प्रत्यक्ष भोगायला येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. कोणीतरी आपल्याला हे सांगत होतं, अरे हे चुकीच आहे बंद कर म्हणून, तर त्याठिकाणी या सगळ्या गोष्टी नरकात नेऊन घालणाऱ्या आहेत, म्हणून यांच्यापासून दूर असलं पाहिजे. म्हणून मद्यपानामधे सुद्धा त्याठिकाणी महाराज कलि वास्तव्य करतो, त्याच्यापासून दूर असलं पाहिजे.

यानंतर त्याठिकाणी महाराज 'स्री संग' स्री संगतीमधे सुद्धा कली वास्तव्य करतो असं आहे. स्रीयांचा संग करू नये असं नाही, त्यांचा संग जर करायचा असेल तर विधिपूर्वक धर्मशास्त्राने सांगितलेल्या प्रमाणे विवाह करावा, ब्रह्मचारी आश्रमाचा त्याग करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा आणि गृहस्थाश्रमात राहून दोन जीवांनी एकत्र येऊन आणि भगवंताच भजन करावं आणि भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. विवाह हा भोगा करीता नसुन विवाह हा योगा करीता आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवाव. परमात्म्या पर्यंत जाण्याकरिता, तुकोबारायांच प्रमाण सांगतो. तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचम वेद आहे. ज्याला वेद कळत नसेल वेद पाहता येत नसेल त्यानं जगद्गुरु तुकोबारायांची गाथा पहावी. गाथ्यामधे त्याठिकाणी वेदातले सगळे सिद्धांत वर्णन करून सांगितलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात.. विधी ते सेवन । विषय त्यागा ते समान ॥
विधीपूर्वक जर विषयाच सेवन जर कराल तर त्या विषयाचा त्याग केल्यासारखंच ते त्याठिकाणी असेल हा नियम आहे. म्हणून विधीपूर्वक विषयाच सेवन करावं. स्री संग जर करायचा असेल तर विवाह त्याठिकाणी करावा अन त्या माध्यमातून त्याठिकाणी स्वस्रीचा संग करावा. स्वस्त्री शब्द अतीशय महत्त्वाचा आहे. परस्री इथे त्याठिकाणी महाराज वर्जित आहे. म्हणून परस्त्रीचा संग त्याठिकाणी करणं हे नरकात जाण्याचं लक्षण आहे. म्हणून स्रीयांपासुन दुर असलं पाहिजे. त्या स्रीकडं पाहताना ती आई या दृष्टीनच पाहिलं पाहिजे. वारकऱ्यांचा नियम आहे, वैष्णवांचा नियम आहे.
महाराज वर्णन करून सांगतात..
पराविया नारी रखूमाई समान । हे गेले नेमून ठाईचे चे ।।
हे ठाईचच आमचं, ठरलेलंच आहे. काय ? परस्री जी आहे ती आमच्या करता आईसारखी आहे. म्हणून तिला आई असंच समजावं.

स्त्रियांचा संग त्याठिकाणी.. तुम्ही चिरंजीवपद वाचा. ज्याला खरंच परमार्थाला सुरुवात करायची असेल ना, ज्याला खरा त्याठिकाणी विचारपूर्वक परमार्थ करायचा असेल त्यानं सगळ्यात आधी नाथांच "चिरंजीव पद" वाचावं अन चिरंजीव पदांमधे त्याठिकाणी काय सांगितलंय ते पहावं. ते म्हणतात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या ।। तुकोबारायांच प्रमाण आहे ते म्हणतात की त्याठिकाणी स्त्रियांचा संग कोणत्या रीतीने नको. लाकडाची नको, कष्टाची नको, मातीची नको, कोणत्या अंगान कलंकित करेल सांगता येत नाही. म्हणून एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण। प्राण गेल्या जाण करू नये ।। प्राण गेला तरी चालेल पण एकांतात लोकांतात स्त्रियांनी भाषण करायचं नाही. फारच जर त्याठिकाणी महाराज काही काम अडून पडल असेल, फार महत्वाच त्याठिकाणी काम असेल तर दोन शब्द त्याठिकाणी कामापुरत बोलावं इथपर्यंत ठीक आहे. स्वतःच्या स्त्रीबरोबर सुद्धा बोलण्याची मर्यादा सांगितली, स्वतःची पत्नी आहे तिच्याबरोबर सुद्धा त्याठिकाणी मर्यादितच बोलावं. तुम्ही नाथांच त्याठिकाणी वाङमय बघा, ते वाचण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून अशा पद्धतीन त्याठिकाणी स्रियांचा संग टाकला पाहिजे. परस्रिला आई समान समजलं पाहिजे.
तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही त्याठिकाणी स्रियांची निंदा करता हात का ? अजिबात करत नाही. त्यांची निंदा करायचं काय काम आहे ? स्री तर आमच्या करीता आई आहे. म्हणून ती जगत जननी आहे. ती अंबिका आहे. ती भवानी आहे. ती भगवती आहे. तिच्याकडे या दृष्टीने पाहिलं पाहिजे. तिला नमस्कार केला पाहिजे.
नारी की निंदा मत कर यारा , नाही रतन की खान ।
जिस नारी से प्रगट हुये, शुक भीष्म हनुमान ।
शुकाचार्यां सारखे, भिष्माचार्यां सारखे, हनुमंत रायांसारखे त्याठिकाणी महापुरूष या नारीच्याच माध्यमातून प्रगट झाले. म्हणून नारी ची निंदा करायची असं नाही, तिला वंदन करायचं. म्हणून तिला वंदन करावं, तिला आई समजाव, तिच्यावर त्याठिकाणी आई म्हणून अशा पद्धतीन प्रेम करावं.
पर उपकारी नेने परनिंदा । परस्रीया सदा बहीनी माया ।
उत्तमची गती तो एक पावेल ।।
भगवंतापर्यंत जाण्याची सहज नियमावली संतांनी सांगितली महाराज. परस्रिया सदा बहीनी माया । परस्रि ही त्याठिकाणी आपली बहीण आहे, आपली आई आहे, असंच समजलं पाहीजे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे महाराज. नाहीतर काम अशी विलक्षण वस्तू आहे की जो त्याठिकाणी वय पाहत नाही, कोणत्याही वयात त्याला उधाण येतं महाराज, सांगता येत नाही. म्हणून तर त्याठिकाणी सावध असलं पाहिजे, आपल्या वृत्तीवर त्याठिकाणी लगाम असला पाहिजे.
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ।। नित्य नवीन दिवस असला पाहिजे जागृतीचा. वैराग्य आपलं कधी ढळेल सांगता येत नाही.

तो दुष्टांत तुम्हाला माहितेय ना सर्वांना ? एक बाबा एका गावात राहात होते. पुराणिक बाबा, लांबलचक दाढी होती. त्याचं गावांमधे एक वैशा राहत होती. तिच्या दारासमोरून त्याठिकाणी जायचे स्नानाला अन ते स्नान करून त्याठिकाणी आले रे आले, नदीवर स्नानाला जायचे. आले की त्या बाईन विचारायचं, बाबा तुमची दाढी खरी आहे का खोटी आहे ओ ? ते म्हणायचे नंतर सांगेन तुला. ती रोज थट्टा करायची त्यांची. तुमची दाढी खरी का खोटी सांगा ? ते बाबा तिला सांगायचेच नाही. असं करता करता थकलेले बाबा होते ते मरून गेले. त्यांना तिरडीवर बांधलं ब्रह्मचारी होते, त्यांना चालवलं लोकांनी, त्या बाईच्याच दाराउन गेलं. आता नदी खालच्याच दिशेला होती म्हणल्यावर तिकडचं जाणार. तिच्या दारातून त्याठिकाणी चाललं. बाईन पाहिलं, बाबा मरून गेले पण मला सांगितलं नाही दाढी खरी आहे का खोटी आहे. तिचे ते शब्द ऐकल्यावर बाब तीरडीवरच उठून बसले आणि मग त्या बाईकड पाहायला लागले, म्हणे बाई तू मला रोज विचारत होतीस ना, माझी दाढी खरी आहे का खोटी आहे. आज तुला खरं सांगतो, माझी दाढी खरी आहे. म्हणे खरी सांगण्याकरिता जिवंतपणी सांगितलं असतं तर नसतं जमलं का ? मेल्यावर उठून बसला आणि मग सांगत हात. म्हणे मरेपर्यंत सांगता येत नाही दाढी खरी आहे का खोटी आहे. "दाढी म्हणजे वैराग्य" वैराग्य मरेपर्यंत सांगता येत नाही कडेला जाईल की नाही म्हणून, म्हणून सावध असलं पाहिजे. विचार पुर्वक परमार्थ केला पाहिजे आणि सावधानतेन परमार्थ करणं फार महत्त्वाचं आहे. ती सावधानता जीवनामधे बाळगा. प्रत्येक दिवसाला त्याठिकाणी नवीन नित्य नवा दिवस जागृतीचा दिवस समजा. त्याच्यावर त्याठिकाणी विचारपूर्वक भगवंताच्या चितनामधे काळ घालवा. हा तेवढाच महत्त्वाचा विचार आहे.
दोन पथ्य परमार्थात पाळायचे आहेत. चांगला माणूस कोण असं जर तुम्हाला विचारलं. चांगला माणूस कोण ? तर तुकोबारायांनी सांगितलं जो परमार्थाच साधन करतो तो सगळ्यात चांगला माणूस. मग परमार्थाच साधन काय आहे ? तर दोन साधने सांगितली तुकोबारायांनी. ते म्हणतात, पर द्रव्य आणि परनारी । याचा धरी विटाळ ।। साधने तरी हीच दोन्ही । जरी कोणी साधील ।
पर द्रव्य परनारी । याचा धरी विटाळ ।।
दुसऱ्याच धन आणि दुसर्याची स्री याचा विटाळ ज्याच्या अंतःकरणात जो बाळगतो आहे तोच सगळ्यात चांगला माणूस. त्याच्याशिवाय चांगला माणूस कोणी नाही. आपल्या आपल्या मनाला विचारा आपण या दोन गोष्टीचा विटाळ पाळलाय का ? दुसऱ्याच्या धनाला मातीसारखं समजावं अन दुसर्याच्या स्त्रीला आईसारखं समजाव. सगळ्यात मोठ्ठ साधन आहे. हे साधन जर कराल बाकीचे साधन नाही केले तरी चालतील, तुम्ही चांगले म्हणून त्याठिकाणी तुमची अशा पद्धतीने ख्याती होईल. नव्हे भगवान स्वतः तुमच्यावर कृपा करील.
गोस्वामीजी त्याठिकाणी छातीठोकपणे सर्वांच्या समोर सांगतात. परधन मीट्टीसम जानिए , परस्त्री मातु समान । फिर भी हरी न मिले, तो तुलसीदास जमान ।
जामीन आहे म्हणतात. जामील व्हायला काय, जामीन कोणी पण होत नाही महाराज अन कोणाचं पण जामीन होता येत नाही. कायदे मोठे कडक आहेत लक्षात ठेवा. ते म्हणतात दुसऱ्याच धन जो मातीसारखं समजतो अन दुसऱ्याच्या स्त्रीला जो आई सारखं समजतो आणि असं समजूनही जरी त्याला हरी भेटत नसेल तर मी त्याला जामीन आहे भगवंताची भेट घडुन देईल. म्हणून जीवनामधे ही पथ्य पाळा आणि महत्त्वाची पथ्य आहेत महाराज.

दुसऱ्याच्या धणाची काय अपेक्षा करतात ? ज्याच्या त्याच्या कपाळावर लिहिलेलंच आहे कोणाला किती मिळणार आहे ते. आपल्या कपाळा पेक्षा जास्त आपल्याला कोणी देणार नाही आणि आपल्या काळातलं कोणी ओढून नेणार नाही हे पक्क लक्षात ठेवा. म्हणून जेवढ आपल्या कपाळात आहे तेवढ मिळणारच आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. किती हात पाय घोडा, किती त्याठिकाणी आट्टाहास करा, किती त्याठिकाणी कासावीस व्हा, तुमच्या नशिबान जेवढ आहे तेवढंच मिळणार. प्रयत्न केल्यान धन मिळत नाही. धन तर प्रारब्धान मिळतं, माझं म्हणणं नाही तुकोबाराय म्हणतात जास्त बोभाटा करू नका.
प्रारब्धेची जोडे धन । प्रारब्धेची वाढे मान । ।
प्रारब्धेची भरे पोट । तुका करी ना बोभाट ।।
बोभाटा करायची गरज नाही, सगळं प्रारब्धाअधीन आहे. प्रारब्धानच धन मिळतं प्रारब्धानच मान मिळतो. प्रारब्धानच पोट भरतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. दुसऱ्याच्या धनाला त्याठिकाणी अशा पद्धतीने मातीसारखं समजा. त्याची अपेक्षा करू नका अन दुसऱ्याच्या स्त्रीला त्याठिकाणी आईसारखं समजा. हे नियम फक्त पुरुषांकरताच आहेत असं नाही, हे नियम बायकां करता सुद्धा आहेत. त्यांनी दुसऱ्या पुरुषाला आपलं भाऊ समजाव, आपला बाप समजाव, आपला बाप भाऊ समजूनच त्याच्याबरोबर वर्तन करावं. नाही तर लोकांनी त्याठिकाणी या बायकांना काही आई म्हणायचं बायकांच्या अंतःकरणात विकार उत्पन्न व्हायचे, ते जमणार नाही. बायकां करतासुद्धा ते नियम आहेत. मग दोघांनी पण आप आपले नियम त्याठिकाणी पाळायचेत. माझं बोलणं जरा कडक वाटतं का तुम्हाला ? जरी असलं, ते महत्त्वाचं आहे म्हणून मी तुमच्यासमोर सांगतो, कारण विकार कोणाच्याही अंतःकरणात उत्पन्न होऊ शकतो. फक्त पुरुषांच्याच अंतःकरणात होतो असं नाही स्त्रियांच्या अंतःकरणात सुद्धा विकार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून तर त्यांनी सुद्धा त्याठिकाणी महाराज परपुरुषाला आपला त्याठिकाणी भाऊ आपला बाप असंच मानलं पाहिजे. म्हणून त्याठिकाणी स्त्रीसंग त्याच्यामधे त्याठिकाणी कली वास्तव्य करतो.
अग्निकुंण्डसमा नारी घुतकुम्भ समो नरः ।
कस्य न चलते मनः।।
स्री त्याठिकाणी अग्नीच्या कुंडा सारखी आहे आणि पुरुष हा तुपाच्या भांड्या सारखा आहे. तूपाच भांड अग्निकुंडा जवळ नेऊन ठेवलं तर तूप वितळत असं नाही तूप पेटतं. जरा प्रयोग करून बघा, कधी यज्ञ करणार असाल तर ते भांड नेवून ठेवा अग्निकुंडाजवळ ते पेट घेईल भांड हा महत्वाचा विचार आहे, म्हणून सावधान.

दादा लक्ष्मणाला त्याठिकाणी प्रश्न विचारला होता, माहिती आहे तुम्हाला ? ज्यावेळेला सीतेला चोरून नेलं ना. सीया को ले चला रावन । रावनान सीतेला नेलं, तिनं त्याठिकाणी आपले अलंकार गाठोड्यात बांधले अन खाली टाकले. त्या वानर सेनेला ते त्याठिकाणी सापडलं गाठोडं. लक्ष्मण दादांनी विचारलं काहो सीतामाईंना चोरून नेलय कोणत्या मार्गे गेले. आपल्याला माहीत नाही पण हे गाठोडं आम्हाला सापडलं, हे दागिने सीतेचे आहेत का बघा. गळ्यातले अलंकार दाखवले लक्षुमणाला, ओळखूच आले नाहीत महाराज. हातातल्या बांगड्या दाखवल्या, ते त्याला ओळखूच झाल्या नाहीत. आणखी अलंकार दाखवले पण कोणतेच अलंकार ओळखु आले नाही. तेव्हा जोडवे दाखवले ना जोडवे म्हणे हे माझ्या आईचेच आहेत, सीतेचेच आहेत. म्हणे का रे ..! एवढे सगळे दागिने दाखवले एवढे दागिने तुला ओळखू आले नाहीन जोडवे कसे काय ओळखू आले ? तो म्हणला वरती तोंडाकड बघायचं काही कामच पडलं नाही. वरती त्याठिकाणी बोलायचं कधी काम पडलं नाही. ती माझी आई आहे, मी तिच्या चरणांकड पाहूनच सदैव त्याठिकाणी बोलत राहिलो. तिच्या चरणांचच ध्यान करत राहिलो, म्हणून चरणांमधे पायामधे असणारे अलंकार मला ओळखू आले. केवढी शालीनता, केवढी त्याठिकाणी सात्वीकता, केवढी निष्ठा, केवढी तपस्यर्या या सगळ्या गोष्टी आपल्याही जीवनामधे असाव्यात. म्हणून समोरून जर त्याठिकाणी माता-भगिनी आल्या तर त्यांच्या तोंडाकड पाहून गप्पा मारण्यापेक्षा काय काम असेल ते दोन शब्दात त्याठिकाणी उरकून घ्यावं, पायाकड पहावं तिला "आई" समजून तिला "नमस्कार" करावा हे तेवढेच महत्त्वाचं आहे.
आता ज्याला कळेल त्याला कळेल, नाही कळेल त्याला बाबा काय करतो. बाबाच सांगायचं काम आहे. म्हणून सर्वांनी ते आत्मसात करा, गरजेचं आहे महाराज म्हणून तर त्याठिकाणी, का सांगतो आहे कशाकरिता त्याचं कारण त्याठिकाणी माणसाचं वय संपून जाऊ शकतं पण माणसाची तृष्णा संपत नाही हे महत्त्वाचं आहे.
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता: तपो न तप्तं वयमेव तप्ता: ।
कालो न यातो वयमेव यतः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा: ॥
तृष्णा संपत नाही आपण संपून जातो, म्हणून ती तृष्णा पोटात असते तिला घालवायचं जर असेल तर अशाच पद्धतीन आपलं जीवन आपण जगल पाहिजे. चला..!

स्रीसंग त्याच्यात कली वास्तव्य करतो आणि हिंसा, चवथ स्थान कलिला राहायला मिळालं हिंसा. माणसाण अहिंसा तत्त्वाचा स्वीकार करून असावं अहिंसा, हींसावादी नसावं. हिंसा फक्त शस्रानिच होते असं नाही हिंसा तर शब्दानी सुद्धा होते. आपले शब्द सुद्धा असे नाजूक असावेत कि जे, जैसे कल्लोळ अमृताचे. ते अमृताचा कल्लोळ असावा. आपले शब्द म्हणजे ते त्याठिकाणी कोणाला दुखवणारे नसावेत. म्हणाल तु त उठसूट त्याठिकाणी झोडून काढायचा प्रयत्न करतो. अरे माझ्या करिता नाही झोडत. मला असं वाटतं माझ्या या पोट तीडकीच्या बोलण्यान, माझं बोलणं एखाद्याच्या पोटात शिरावं अन त्याच्या पोटात शिरून त्याच्या जीवनामधे त्याठिकाणी भगवंताच्या भक्तीन पदार्पण करावं हा उद्देश आमचा आहे. म्हणून तर आमच्याकड त्याठिकाणी धन आहे. महाराजांनी काल सांगीतलं.. आम्हा घरी धन शब्दांचीच. त्याठिकाणी शब्दच आमच्या घरचे धन आहेत महाराज. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोका ।।
म्हणून हे आमच्याकड धन आहे तेच आम्ही वापरणार आहोत. आमच्याकड शब्द आहे शब्दाचच ते आम्ही वापरणार पन आपल्याकडचे जे शब्द आहेत ते दुसऱ्याच त्याठिकाणी अनहित करण्याकरिता नसावेत, ते दुसऱ्याचं हित करणारे असावेत. आपल्या शब्दांनी त्याठिकाणी एखाद्याला आणि त्याठिकाणी समाधान प्राप्त व्हावं असे आपले शब्द मुखातून त्याठिकाणी बाहेर पडावेत, हा त्यातला भाव आहे.
नही चाहिये दील दुखाणा किसी का ।
कदा न रहा जग मे, कदा न रहेगा ।
नही चाहिये दिल दुखाना किसी का ।
कुणाला दुखवणं योग्य नाही, म्हणून शब्दांनी हिंसा त्याठिकाणी करायची नाही. लोकं त्याठिकाणी स्वतःला परमार्थिक म्हणून घेतात आणि अनेक प्रकाराण हिंसा करतात.
तुम्हाला माहितेय कीड्या मुंग्यांना मारणं हे सुद्धा हिंसाच आहे. चांगल्या चांगल्या लोकांच्या घरी ती बॅट दिसते इलेक्ट्रिकची. डास घरात आले की फटफट करत बसतात लोक. का? ते चटचट चटचट आवाज येतो चांगलं वाटतं मारायला. त्यांच्यात जीव नाही, ते हिंसा नाही, कशाकरीता हिंसा करावी.
आम्ही एकदा बार्शीला गेलो, एक कलशारोहन होतं आमच्या गुरुजींच्या हस्ते, स्वामीजी त्र्यंबकेश्वरचे आम्हाला घेऊन गेले, गेलो. त्यांना राहण्याकरता खोली त्याठिकाणी मिळाली, एवढे डास होते त्या खोलीत. आता आम्हाला असं वाटलं गुरुजींना डांस चावतात, आम्ही डास मारायला सुरुवात केली. इतके रागावले महाराज ते, ये.. काय करतोस ? म्हटलं स्वामीजी तुम्हाला डास चावतायत म्हणून डास मारतो आहे. ते म्हणले मारायची काय गरज आहे. त्यांचं काम आहे ते करतायत, म्हटलं मग चाऊ द्यायचे का डास, काही आजार झाला मग काय करायचं. ते म्हणले चावतात ना, मग तेवढ्यापुरते बाजूला सरकवायचे की मारून टाकायचे लगेच. किती सहज सगळं जीवन त्यांनी अशा पद्धतीन त्यागमय जीवन जगले. त्यांची किती सहजता आहे, जडभरताच्या पोटातली सहजता आहे महाराज. म्हणून हिंसा करण्याची प्रवृत्ती नाही. हिंसा केल्यान सुद्धा दुःखी होतो. आपण सगळेजण हिंदू आहोत ना हिंदू, उगीच स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचं नाही. हिंदू शब्दाची व्याख्या लक्षात घ्या, हिंदू शब्दाची व्याख्या अशी आहे..
हींसया दुय्यते हृदय यत्स्यया हिंदू ।
ज्याचं हृदय हे हिंसेने दुःखी होतं त्याला म्हणतात हिंदू. हिंदू म्हणजे काय ? ज्याच्या हृदयामधे हिंसेन वेदना होतात त्याला हिंदू म्हणावं. म्हणून आपण हिंदू म्हणून घेणार जर असाल तर हिंसेने तुमचं हृदय दुखू द्या, त्याला वेदना होऊ द्या. कोणाची हिंसा आपल्या हातानं घडू देऊ नका. त्या हिंसेमधे कली राहतो आणि कली आपल्याला बांधल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चार स्थान कलीला राहायला मिळाली. त्याचं पोटच भरलं नाही, तो म्हणला चारच दिली राहायला अजून एखादं द्याना, म पाचवं स्थान राहायला दिलं, ते दिलं सोन. सोन्यामधे कली राहतो. म्हणून सोने वाले सोना नही. म्हणून ज्याच्याजवळ सोन आहे त्याला झोपच नसते महाराज. त्याला जागावंच लागतंय, नेलं चोरून कोणी मग काय करायचं ? म्हणून सोन्यात कली राहतो.

"भागवतातच" त्याठिकाणी वर्णन करून सांगितलंय भगवंतान उद्धवजींना आपल्या विभूती सांगताना, ते म्हणतात, "धातू नामस्मी कांचन" धातुंमधे मी कांचन म्हणजे सोन आहे. भगवान स्वतःच सांगतोय सोन्यामधे मी वास्तव्य करतो अन भागवतातच सांगितलं सोन्यामधे कली वास्तव्य करतो. मग नेमकं कली राहतो का देव राहतो यांच्यापैकी निर्णय कसा करावा ? सोपा निर्णय आहे, फार कठीण नाही. जे सोन कष्टान मिळवलेलं असतं, जे स्वकष्टार्जित स्वतः त्याठिकाणी मिळवलेलं आहे त्याच्यामधे देव राहतो. सोन्याला देव धातू म्हणतात आणि सोनं हा जो धातू आहे ना, हा कमरेपासून खाली घातलेला चालत नाही. कमरेच्या खाली सोन्याचे अलंकार घालायचे नाहीत. ते फक्त देवतांच्याच अंगावर त्याठिकाणी शोभून दिसतात. या बायकांच्या अंगावर बघा सगळे अलंकार सोन्याचे दिसतील पण पायामधे घालण्याचे जे अलंकार आहेत, जोडवे आहेत त्यांचे ते चांदीचे आहेत सोन्याचे नाहीत. सोन्याचे जोडवे फक्त "भगवतीच्याच" चरणामधे पाहायला मिळतील, इतरत्र कुठे पाहायला मिळत नाहीत. कारण सोन हा देव धातू आहे. तो कमरेच्या वरतीच घालायचा, कमरेपासून खाली त्याठिकाणी घालायचं नाही. म्हणून अशा पद्धतीने त्याठिकाणी त्याच्यात देव वास्तव्य करतो आणि सोन्यामधे कली राहतो. कोणत्या सोन्यात कली राहतो ? जे सोन त्याठिकाणी चोरून आणलेलं असेल, जे हिसकावून आणलेलं असेल, लुबाडून आणलेलं असेल, हुंड्यात घेतलेलं असेल, असल्या सोन्यामधे त्याठिकाणी कली वास्तव्य करतो. म्हणून दुसऱ्याचं धन त्याठिकाणी घेण्याची अपेक्षा का करावी. जे दुसऱ्यान त्याठिकाणी बळजबरीन दिलेलं असतंय, ते नाही म्हणतंय ते म्हणतंय पंचवीस तोळे अन हे म्हणतंय पाचच तोळे घ्या. घासाघीस करून पंधरावर आले, त्याचा जीव कासावीस होतो त्या बापाचा. तो म्हणतो त्याठिकाणी अहो असं करू नका, माझी परिस्थिती नाही. नाही तेवढं दिल्याशिवाय जमायचं नाही. मग मर तू, ते घे त्याचं सोन घरात, त्याचं सोनं घरात आलं की जाइल तुझं सोन घेऊन, हा महत्वाचा विचार आहे. ते सोन घरात आलं ना हुंड्याच की आपलं सोन त्याच्या मागं जातच असतं महाराज, काही चिंता करू नका.
तुम्हाला आपलं सोन माहिती आहे ना सगळ्यांना ? ते आपलं सोन म्हणजे ते आपला मुलगा. ती येते त्याठिकाणी सोन घरात घेऊन, ती रुबाबच करते महाराज. ती भांडे घाशीत नाही, धून थुत नाही, ती म्हणते काय धुन धुवायला अन भांडी घासायला आले काय ?
पंचवीस तोळे घेऊन आले तुच बस भांडे घाशीत, हा महत्वाचा विचार आहे. घेऊन जाते महाराज नवऱ्याला बाहेर, एक शब्द सुद्धा बोलू देत नाही, रुबाब करते. म्हणून आपण जर त्याठिकाणी स्वाभिमानान जगायचं असेल तर दुसऱ्याच्या फुकटच्या धनाची अपेक्षा करू नका. ते दुसऱ्याचं फुकटचं धन आपल्या घरात राहात नाही ते निघून जातं, म्हणून देवान आपल्याला दिलंय ते कष्टान दिलेलं लोकांना पुरत नाही, फुकटच दिलेलं कसं पुरेल हो. लोकाचं कशाला घेण्याचा प्रयत्न करता, लोकांकडून कशाला मागायचा प्रयत्न करता.
उलट तुमचं कौतुक होईल, जर तुम्ही हुंडा घेतला नाही तर. उलट त्याठिकाणी चार लोकांमधे तुमचं नाव निघेल. लोक आवर्जून सांगतील फार चांगले पाहुणे मिळाले, काहीच घेतलं नाही वो, काहीच घेतलं नाही फक्त म्हणले तुमची मुलगी आम्हाला द्या, काही नको तुमच्याकडून. तुमचं त्याठिकाणी कौतुक केलं जाईल. कशा करीता लोकांच्या धनाची अपेक्षा करता, दुसऱ्याचं धन पुरत नसतं, ते घेतल्यान त्याठिकाणी महाराज आपल्या धणाला सुद्धा लोह चुंबका सारखं ओढुन घेऊन जात असतं. म्हणून सोन्यामधे कली राहतो. कोणत्या ? जे त्याठिकाणी असं तळतळाट घेऊन त्याठिकाणी आणलेलं असत. ते आता तो काय मनापासून देतो थोडाच, तो तळतळुन देतो, त्याची तळतळ होते जिवाची. तो म्हणतो नको द्यायला पण आता ऐकतच नाही काय करायचं ? स्थळ तर चांगलं आहे सोडावस वाटत नाही. मग जाऊद्या चार-पाच तोळे जास्त जातील पण पोरीचं चांगलं होईल. म ते तळतळुनच देतो आणून. कळतय ना तुम्हाला मी काय सांगतो ते, जे तळतळीच असतं ना ते जात असतं निघून. जाऊ द्या तुम्हाला सगळ माहिती आहे, कशाला जास्त सांगू.
पाच ठिकाणी कली राहू लागला, कलीला राहायला जागा मिळाली. धर्माला समाधान प्राप्त झालं, पृथ्वीला समाधान धरणीला समाधान प्राप्त झालं. असं त्याठिकाणी सर्व गुण्यागोविंदाण राज्य त्याचं सुरू आहे. राजा त्याठिकाणी महाराज धर्मात्मा आहे, पण त्याठिकाणी त्यानं स्वतःच राहायला जागा दिली कलीला पाच ठिकाणी. आता कली त्या पाच ठिकाणी राहिला तरी त्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, तो त्याचं काम करतोच आहे.

No comments:
Post a Comment