Followers

Monday, April 13, 2020

श्रीमद्भागवत कथेतील चिंतन110

🕉---#श्रीमद्भागवत_कथेतील_चिंतन---(110)---🕉
श्रीगुरूमाऊली..👏
श्रीकृष्णकृपां
--------------------🙏 🌷 🕉️ 🌷 🙏---------------------
आता "पांडवांच राज्य" त्यांना मिळालंय. बऱ्याच काळापर्यंत पांडव राज्य करू लागले. पांडवांच जीवन दुःखातच त्याठिकाणी गेलं, पण आता मात्र पांडवांच्या जीवनामधे एक आनंदाचा क्षण आला होता. तो आनंदाचा क्षण म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला ? जी "उत्तरा" त्याठिकाणी गर्भवती आहे ना. तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला होता, ती उत्तरा प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. तो मुलगा त्याठिकाणी असा जन्माला आला विलक्षण, तो जन्मल्याबरोबर रडलाच नाही महाराज. मोठे मोठे डोळे करून सगळ्यांकडे पाहायला लागला टकमक टकमक. काय पाहत होता माहिती आहे ? तो विचार करत होता, मी आईच्या गर्भात असताना कोणीतरी मला मारायला आलं होतं आणि माझं संरक्षण करण्याकरिता "शंख चक्र गदा पद्म" धारण करून, "पीतांबर" धारण करणारा माझ्या भोवती त्याठिकाणी चकरा मारत होता. या सगळ्या लोकांमधे तो कुठे दिसतो आहे का, त्याला शोधत होता. माणसा माणसाची परीक्षा पाहात होता. त्याचं नावच पडलं "परिक्षित". हे परिक्षित नाव पडण्याचं कारण आहे.
ब्राह्मणाला बोलावलं. पांडवांना मोठा आनंद झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं त्याठिकाणी महाराज विधिपूर्वक त्याचं नाव ठेवलं "विष्णूरात". हे विष्णूरात त्याचं नाव आहे. का बरं विष्णूरात नाव ठेवलं ? "भगवान विष्णून गर्भात ज्याचा सांभाळ केला" तो विष्णूरात. असा विष्णूरात आहे.
...

No comments:

Post a Comment