Followers

Monday, April 13, 2020

गौळीयाचें घरी

निगमाचे वन । नका शोधू करू सीण ।।
या ते "गौळीयाचें घरी" । बांधलेसे दावे वरी ।।
पडिलेती भ्रमे । वाट न कळता वर्में ।।
तुका म्हणे भार । माथा टाका 'अहंकार' ।।
वेदाच्या वनात तुम्ही "हरीला" शोधण्याचे व्यर्थ कष्ट घेऊ नका ।।
गवळ्याच्या घरी तुम्ही या, तेथे त्याला दाव्याने बांधले आहे ।।
हरीला शोधण्याची युक्ती न कळल्यामुळे तुम्ही भ्रमाने फिडला आहात ।।
तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या डोक्यावरील देहाभिमानाचा अहंकाररूपी भाथ टाकून द्या ।।

No comments:

Post a Comment