Followers

Wednesday, April 15, 2020

अ.क्र. - ३३३७

 (अ.क्र. - ३३३७)
(साधूपणाचे ढोंग आणणाऱ्यावर प्रस्तुत अभंगातून तुकोबा प्रहार करतात -)
आमुची गोसावी अयाचित वृत्ती ।
करवी शिष्या हाती उपदेश ।।१।।
दगडाची नाव आधीच ते जड ।
ते काय दगड तारू जाणे ।।२।।
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी ।
सोंग संपादनी करिती परी ।।३।।
अर्थ -
काही ढोंगी साधू स्वतःची वृत्ती संन्यस्त (उदासीन) असल्याचे सांगून त्यांच्याकडे आलेल्या लोकांना शिष्य किंवा मध्यस्थांकरवी उपदेश करवतात. ।।१।।
दगडाची बनवलेली नाव (होडी) आधीच जड असते. ती पाण्यावर तरंगत नाही. मग तिच्यात घातलेले जड दगड ती तारून नेईल असे समजण्यात काय अर्थ आहे ? (त्याप्रमाणे जे ढोंगी लोक स्वतःच संसार तरून जाऊन शकत नाहीत ते इतरांना काय तारणार ?) ।।२।।
तुकोबा म्हणतात, अशा लोकांनी केवळ साधूचा वेष धारण करून साधुत्वाची विटंबना चालवलेली असते; मात्र वेष परिधान करून त्यांनी केवळ सोंग संपादनी केलेली असते. ।।३।।
।राम कृष्ण हरी।

No comments:

Post a Comment