Followers

Sunday, April 26, 2020

ABHANG

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
कापुराचे कलेवर घातले करंडा ।
शेखी नुरेचि उंडा पहावया ॥१॥
मा ज्योती मेळे कैसा उरेल कोळिसा।
भावें हृषिकेशा भजतां ऐसें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी ।
नामयज्ञें मिठी दिधिलिया विरे ॥३॥
◆भावपराग◆
कापुराचा अलंकार वा चित्र तयार करून करंड्यात घालून ठेवले तर कांही कालाने त्याचा अंशही रहात नाही.१.किंवा कोळसा जर अग्नीरूप झाला तर तो
कोळसेपणाने उरत नाही. त्याप्रमाणे श्रद्धेने भगवंताचे भजन केले तर जीव जीवपणाने उरत नाही.२. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही जन्म देणारी प्रपंचरूपी वासनाच मोठी खोटी आहे. परंतु नामयज्ञाला मिठी दिली तर परमात्म भाव प्राप्त होऊन ती वासनाचा
विरून जाईल.३.
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment