Followers

Friday, April 17, 2020

ABHANG



अभंग.
यश किर्ती वानूं नेणे मी वाखाणूं।
रामकृष्ण आम्हां सणू नित्य दिवाळी ॥१॥
नरहरि रामा नरहरि रामा।
पुराणपुरुषोत्तमा हरि गोपाळा ॥२॥
या नेमीं अक्रूर बोधला परिक्षिति उपदेशिला।
अर्जुनाशी जाला साहाकारी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नामेवीण जो नरु ।
तो होय भूमिभारु ये संसारी ॥४॥
◆भाव◆
भगवंताचे यश, कीर्ति औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे एवढे अगाध गुण आहेत की त्याचे वर्णन करणे माझ्यासारख्याला अशक्य आहे. रामकृष्ण नामाचा
उच्चार करण्यातच आम्हाला दिवाळी सारखा नित्य आनंद आहे.१.नरहरि, राम पुराण पुरुष, हरि, गोपाळ.२.या नामाचा अक्रूरास बोध झाला. शुकाचार्यांनी याच
नामाचा परिक्षिती राजांस उपदेश केला. याच नामाचा अर्जुनाने उच्चार केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याला साह्य झाला.३.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो मनुष्य नामस्मरण न करता वावरतो तो भूमीला केवळ भारभूतच झालेला असतो.४.
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment