Followers

Wednesday, April 15, 2020

श्रीमद्भागवत कथेतील चिंतन-1

🕉---#श्रीमद्भागवत_कथेतील_चिंतन---(1)----🕉
श्रीगुरूमाऊली..👏
श्रीकृष्णकृपां
--------------------🙏 🌷 🕉️ 🌷 🙏---------------------
म्हणून त्याठीकाणी महाराज धर्मराज पुढे गेले, नरका जवळून जात होते. नरका जवळून जाताना विमानात त्यांच्या. त्यांची सावली नारकीय जीवांवर पडत होती. नरकातल्या जिवांना समाधान प्राप्त होत होतं.
[ दुर्योधन नरकातच पडला होता, वैतरणी नदीत होता महाराज. ज्याच्यामधे पु आहे, ज्याच्यामधे रक्त आहे, ज्याच्यामधे मुत्र आहे, ज्याच्यामधे विष्टा आहे असं त्याठीकाणी महाराज भयंकर परिस्थिती होती, त्याच्यात पडला होता. धर्मराजाला पाहीलन त्याच्यात बुडी मारली त्यानं, म्हणला नको त्याला तोंड दाखवायला. ]
असं त्याठिकाणी धर्मराजान विनंती केली मला स्वर्गाला नेवूच नका. मग..! इथेच थांबवा. माझी सावली पडल्यान जर यांना सुख प्राप्त होत आहे तर मी इथ राहिल्यान किती सुखी होतील. मला स्वर्गाला जायचंच नाही, मला नरकातच राहायचं आहे.
( "नरक मागणारा माणूस" कोनी सापडेल का..?
"धर्मराजान नरक" मागितला. )
नाही म्हणे तुम्हाला जावं लागेल स्वर्गाला..!
पुढे जाऊ लागले, जाता जाता एक कुत्रा जवळ आला. तो कुत्रा बोलू लागला, धर्मराजाला म्हणू लागला मी तुम्हाला शरण आलोय मलाही तुमच्याबरोबर घेऊन चला. कुत्र्याला त्याठिकाणी आपल्या बरोबर घेतलं स्वर्गाला त्याठिकाणी जातायत, स्वर्गाच्या दरवाज्यात जाऊन उभे राहीले आतमधे जाण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणे खबरदार तुम्हाला एकट्यालाच आतमधे यावं लागेल कुत्र्याला आत आणता येणार नाही. ते म्हणे कुत्रा जर आत येणार असेल तरच मी आत येईल नाहीतर जातो मागे. आता काय कराव.! म्हणून कुत्र्यासहित आतमधे त्याठिकाणी जायला मिळालं. तो कुत्रा सामान्य नव्हता, यमधर्म होता. मरेपर्यंत, ठिकाण्यावर जाईपर्यंत परीक्षा, यमधर्म प्रत्यक्ष प्रगट झाला, म्हणे परीक्षेत उत्तीर्ण झालास.
'कुत्र्याला" सुद्धा जाता येतं स्वर्गात "संतांची संगती" केली तर. म्हणून तर त्याठिकाणी महाराज संतांचा संग कोणत्याही रीतीने तरी झाला__. व्हावे त्यांचे द्वारी स्वान याति.
संत समागम एखादीये परी | व्हावे त्यांचे द्वारी स्वान याति || कुत्रा झालं तरी सुद्धा भगवंताचा त्याठिकाणी भक्त होता येतं, नव्हे भगवंताच्या भक्तांबरोबर स्वर्गात जाता येतं, हे वैभव आहे.
आतमधे प्रवेश केल्याबरोबर एक अंगठा गळून पडला म्हणतात धर्मराजाचा. का बरं..? ते नरोवा कुंजरोवा म्हणला होता ना.. त्याच्यामुळ एक अंगठा गळून पडला. म्हणजे एकदा खोटं बोलला तरी एक इंद्रिय गळुन पडलं. तुम्ही ऐकतात सर्वजण ? आता आपलं काय काय तिथ पर्यंत पोहोचेल याचा पक्का विचार करून घ्या. आपण जाणार आहोत पण आपलं नेमकं काय काय पोहोचेल. अहो आपण त्याठिकाणी दिवसातून किती वेळा खोटं बोलतो याची यादी करायचं ठरलं तर भली मोठी यादी होईल कागदं संपून जातील. एवढं त्याठिकाणी आपण खोटं बोलतो. हे शिकायचय म्हणूनच ऐकायचय, लक्षपूर्वक ऐका..! धर्मराज त्याठिकाणी अशा पद्धतीने स्वर्गामधे जाऊन पोहोचले.
...

No comments:

Post a Comment