🙏विठ्ठल आमचे जीवन 🙏
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५
(अ.क्र. - ६२३)
परस्त्री व परधन यापासून दूर राहण्याचा उपदेश
परस्त्री व परधन यापासून दूर राहण्याचा उपदेश
विटाळ तो परद्रव्य परनारी ।
येथूनी जो दूरी तो सोवळा ।।१।।
येथूनी जो दूरी तो सोवळा ।।१।।
गद्ये पद्ये काही न धरावी उपाधी ।
स्वाधीनची बुद्धी करूनी ठेवा ।।२।।
स्वाधीनची बुद्धी करूनी ठेवा ।।२।।
विचारांचे काही करा रे स्वहित ।
पापपुण्यातील भांडवल ।।३।।
पापपुण्यातील भांडवल ।।३।।
तुका म्हणे न लगे जावे वनांतरा ।
विश्व विश्वंभरा सारखीचे ।।४।।
विश्व विश्वंभरा सारखीचे ।।४।।
अर्थ -
परद्रव्य आणि परस्त्री यांना विटाळासमान मानून यांच्यापासून जो दूर राहतो तोच खरा सोवळा (शुद्ध) समजावा. ।।१।।
स्वतःच्या लेखनकलेच्या अथवा काव्यप्रतिभेच्या उपाधीचा अहंकार न धरता आपण स्वतःच्या मनाला चांगले नियंत्रित करावे. ।।२।।
चांगल्या पद्धतीने विचार करून तुम्ही तुमचे हित करून घ्या. कारण हेच तुमच्या पापपुण्यरूपी संपत्तीतील भांडवल आहे. ।।३।।
तुकोबा म्हणतात, स्वतःच्या वासनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जंगलात जाऊन संन्यासी बनण्याची गरज नाही. हे विश्व म्हणजेच ईश्वर आहे असे समजून ईश्वराची उपासना केली म्हणजे आपण मुक्त होतो. ।।४।।
।राम कृष्ण हरी।
No comments:
Post a Comment