Followers

Sunday, April 26, 2020

ABHANG





सुकुमार वेल्हाळ रुपे पैं सुंदर ।
तोचि पैं आगर नंदाघरी ॥ १॥
अवघ्या सुख देतु अवघ्या विदटे।
अवघेचि पेठे हरिनाम ॥ २॥
यापरी आगरू कृष्णनाम ठसा ।
ओतला सरिसा भाग्ययोगें ॥३॥
बाप निवृत्तिराज उपदेशिती आम्हा ।
ज्ञानदेवा महिमा नामें आला ॥४॥
◆भावपराग◆
हा श्रीहरि रूपाने अत्यंत सुंदर रेखीव सुकुमार असून सर्व गुणाचे आगर आहे. हाच श्रीकृष्ण बालरूपाने नंदाचे घरी नांदत आहे.१.तो दिवटे म्हणून सर्वांना भेटून सुख देतो. त्याचे नांव भक्तीच्या बाजारात आहे.२ असा उत्तम कृष्णनामाचा ठसा ज्याला परमभाग्याने लाभला आहे. तो पुरूष धन्य होय.३ बाप श्रीगुरू निवृत्तीराय ह्यांनी मला कृष्णनामाचा उपदेश केला त्याप्रमाणे मी नामाचा गजर केला.म्हणून मला आनंदाची भूमिका प्राप्त झाली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.४
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment