वारकरी संतत्वाची व्याख्या
सुख सागर आपण व्हावे | जग बोधे निववावे ||
बोधा करू नये अंतर | साधुस नाही आपपर ||
जीव जीवासी पै द्यावा | मागे करू नये हेवा ||
तरणोपाय चित्ती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
बोधा करू नये अंतर | साधुस नाही आपपर ||
जीव जीवासी पै द्यावा | मागे करू नये हेवा ||
तरणोपाय चित्ती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
संतांनी आपल्याला सापडलेल्या सुखप्राप्ती च्या उपायाचा सर्व जगाला आपपरभाव न ठेवता बोध करावा. जीवांचा उद्धारासाठी आपला जीव पणाला लावावा. तो लावला म्हणून खेद खंत करू नये. जगाला बोध करताना तो मेघदृष्टीने करावा. भेदभाव करू नये व हातचे राखूनही ठेवू नये अशी वारकरी उपदेशपद्धती आहे. ती पुढे तुकोबांनी सुद्धा प्रकर्षाने मांडली आहे. ज्ञानदेवांनीही पुढे ज्ञानेश्वरी लिहून संसारश्रांत जीवांना बोधाने निववले. मुक्ताईंची वाणी किती क्रांतदर्शी ( prophetic) आहे याचा येथे प्रत्यय घेता येतो. 'ना आदिगुरू शंकरा | लागॊनि शिष्य परंपरा | बोधाचा हा संसारा | झाला जो आमुते || तो हा तो घेऊनी आघवा | कळी गिळतया जीवा | सर्व प्रकारे धावा | करी पा वेगी ||
अशी सद्गुरूंची अनुज्ञा. याच परंपराप्राप्त उपदेशाने ज्ञानदेवांनी जग निववले. 'मग आर्ताचेनि ऒरसे | गीतार्थग्रथनमिसे | वर्षला शांतरसे | तो हा ग्रंथु ||' ज्ञानदेवांनी पुढे या बोधाचा पाऊस पाडला. हाच बोध कीर्तनातून सांगायचा असतो. 'येणे बोधे आम्ही असो सर्वकाळ | करू हे निर्मळ हरिकथा ||. कीर्तन हे सुखबोधाने जग निववायचे साधन आहे.

No comments:
Post a Comment