Followers

Saturday, April 18, 2020

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत
*___________________________*
*तेथ ध्येय उत्तम म्हणे जाण । ध्याता नीच होये आपण ।*
*तदंगें " ध्यान " गौण । गुणदोष जाण वाढवी ।।७-७७।।*
*___________________________*
🙏 *"जीव हा खरोखरी आत्मरूपाने पूर्ण निर्दोष असूनही, आपल्याला हीन समजतो, बद्ध समजतो आणि भेदबुद्धी अंगीकारून असे समजतो की, आदर्श, शुद्ध, पवित्र, परमोच्च, पूर्ण अशी एक अवस्था आहे. हे तो एकटाच आपल्याच अंतरंगात कल्पितो, आणि पूजा करून, ध्यान करून, प्रयत्न करून, ती पूर्णावस्था " मी " जो अपूर्ण आहे ती प्राप्त करीन, व केली पाहिजे असेही समजतो. निर्गुण पूर्ण अशा त्याच्या ठिकाणी " मी पूजक, मी ध्यान करणारा, कमी आहे, तो मी गुणात्मक साधनेने ध्यानाने पूर्ण होईन, " अशी सारी स्वतःच्या कल्पनेतूनच त्रिविध स्थिती निर्माण करतो. उद्धवा, अशा तऱ्हेने आपण काय आहोत या ऐक्याच्या स्थितीपासून तो " आपण कसे असावे " या काल्पनिक ध्येयाकडे मनाने कल्पनेतच धाव घेतो. या प्रकारे मूळ कल्पनेतील मिथ्या सृष्टीत स्वतःच्या कल्पनेने आणखी एक भेदात्मक सृष्टी कल्पितो. आत्मस्थानीच सर्व सुखाचे व आनंदाचे ठिकाण असतांना तो इंद्रियांच्या द्वारा मज्जासंस्थेला मिळणाऱ्या सुख संवेदनांच्या मागे लागतो व त्यात तो जसजसे इंद्रियांचे लाड पुरवीत जातो तसतसा जन्ममरणात व कर्माकर्मात गुरफटत जातो. पण तू इथे हे लक्षात घे की ही सुखे म्हणजे विषमिश्रित गोड खिरीसारखी घातक असतात. पावलोपावली त्यात आपला घात आहे हे ओळख. इंद्रियांचा निग्रह कर. त्यासाठी मनालाच हा धडा शिकला पाहिजे की विषयभोग हे विषमय आहेत. मनाने इंद्रियांची बाहेरची धाव आवरून घे. ती मनांतच वळव. जे नित्य शरीरधर्म आहेत त्यांपूर्ती इंद्रियांची कार्ये चालणारच. देहधारणा हा देहाचा धर्म आहे. पण त्या बाबतीत मी चांगला, माझे खाणेपिणे, , माझी वस्त्रे, माझे आचरण चांगले, मी मोठा सदाचारी, वगैरे कोणत्याही प्रकारे मन त्यात घालून कोणतीही बाब अभिमानाची, गर्वाची होऊ देऊ नकोस. हा ही एक उत्तम त्याग आहे. आणि परमार्थत: इंद्रियांचे शारिरीक कर्म व प्राप्त होणारे सुखदुःखात्मक संवेदनांचे स्पर्श यात गर्वाचा किंवा स्वतःला , आत्म्याला महानपणा, किंवा दीनपणा मानण्याचे काहीच कारण नाही. याच युक्तीने कर्मे घडत असूनही " तू ती करतोस " असे बंधन पडणार नाही. "*
*___________________________*
🌹 *अकर्तेपणा आहेच ; तो फक्त ओळखावा लागतो.*
*___________________________*
*लेखक:- श्री दिवाकर अनंत घैसास.* 🙏
*___________________________*
 lजय जय रघुवीर समर्थ l
श्री समर्थ रामदासस्वामी आपल्याला तापत्रय समजावून सांगतात की मनुष्याला मिळणारे दुःख हे या तीन तापांच्या रूपाने होते,त्यातील आध्यात्मिक ताप सांगितला आता दुसरा ताप ज्याला आधिभौतिक असे नाव आहे याचे वर्णन श्री समर्थ करतात.
प्रथम आधिभौतिक म्हणजे काय याचा विचार करू.
मनुष्य जीवन जगत असताना त्याचा संपर्क सचेतन म्हणजे जीवित आणि अचेतन म्हणजे जीव नसलेल्या अशा दोन्ही बरोबर होत असतो आणि या दोन्ही पासून आपल्याला जे दुःख प्राप्त होते त्याला आधिभौतिक असे म्हणतात.
श्री समर्थांनी अनेक उदाहरणे सांगून हा ताप किती दुःख देतो हे सांगितले आहे.
सचेतन गोष्टीपासून म्हणजे मनुष्य किंवा इतर जीवित प्राणी यांचेपासून होणारे दुःख आपण सर्व जाणतोच तसेच अचेतन गोष्टी सुध्दा आपल्याला त्रास देतात जसे अपघात होणे,पायाला ठेच लागणे इत्यादी.
बाळपणी मरे माता l
तारुण्यपणी मरे कांता l
वृध्दपणी मृत्य सुता l
या नाव आदिभूतिक l
श्रीराम l
दशक 3 समास 7 ओवी 80
मनुष्याला होणारे मानसिक दुःख हे सुध्दा आधिभौतिक तापाचे उदाहरण आहे.
बाळपणी आईचा होणारा मृत्यू तसेच तरुणपणी पत्नीचा मृत्यू आणि म्हातारपणी पुत्राचा मृत्यू हे अतिशय मानसिक वेदना देणारे दुःख आहे आणि हे ज्याच्या वाट्याला येते तोच जाणतो.
हे वियोगाने होणारे दुःख अनेक प्रकारचे आहे आणि आपण सर्वांनी याचा अनुभव घेतला आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला कोणाचा तरी वियोग होतोच.
अशा प्रकारचे दुःख प्राप्त होऊ नये किंवा झाले तरी ते सहन करण्याची शक्ती प्राप्त होण्यास अखंड भगवंताचे भजन करावे.
lजय जय रघुवीर समर्थ l
जय जय श्रीगुरूदेव
विवरण 5
श्रीगुरूदेववाणी भाग 2 विचार 3
पैसा, सत्ता, मालमत्ता, शिक्षण, घर, बुद्धी, सौंदर्य, चातुर्य, शरीर, प्राण, मन, इंद्रिये, वाणी, पशुपक्ष्यादि प्राणी, वृक्ष, झाडे, वेली, पाने, फुले इत्यादि सर्वच या जगातील शक्तीस्थाने आहेत. जे जे उपयुक्त आहे त्याला सामर्थ्य म्हणता येईल. जीवन जगताना ते सुसह्य आणि सुलभ करून आनंदाकडे घेवून जायला हे सर्व उपयुक्त आहेत. म्हणून त्यांना शक्तीस्थळे म्हटले आहे. या जगाचे बारकाईने जर निरीक्षण केले तर असे दिसते की, या जगातील प्रत्येक गोष्ट उपयुक्तच आहे आणि या अर्थाने ती सामर्थ्याने युक्त आहे. जगण्याला उपयोगी असणार्या अशा सामर्थ्याचे आपल्याला आकर्षण असणे अगदी स्वाभाविक आहे. आता अडचण अशी आहे की, जे सामर्थ्य आहे ते आपल्याला उपयुक्त आहे आणि म्हणून त्याच्या मागे धावावे एवढेच कळते किंवा तशी शिकवण आपल्याला दिली जाते. उपयुक्त असलेल्या सामर्थ्याला दुसरी एक बाजू आहे आणि ती आपल्या लक्षात येत नाही. ती अशी की, ही सर्व शक्तीस्थाने आपल्याला उपयुक्त आहेत, आपल्याला आधार देतात परंतु त्यांच्या उपयुक्त असण्याला आणि आपल्याला आधार देण्याला मर्यादा आहे. म्हणून त्यांना अल्पशक्तिमान असे म्हटले आहे. विपरीत समजूतींनी प्रभावित झालेले तुम्ही आम्ही अशा अल्पशक्तिमान असलेल्या जड चेतनांना धरण्याचा मोह करतो. म्हणून पूज्य श्रीगुरूदेव म्हणतात की, अल्पशक्तिमानाला धरण्याचा आणि त्यांच्यावर स्वामित्व करण्याचा मोह टाळावा. हा मोह टाळायचा असेल तर सावधानयुक्त विवेकाची कास धरावी लागेल. येथे विवेकच उपयोगी पडतो. विवेक असे दाखवतो की, ही सर्व शक्तीस्थळे देश काल आणि परिस्थितीवशात कधी उपयोगी तर कधी अनुपयोगी ठरतात. जी शक्ति एका देशामध्ये कामी येते ती देश बदलला की कुचकामी ठरते. जी शक्तीला एका व्यक्तिला आधार देते तर तीच शक्ति दुसर्याला आधार देईलच असे नाही. हे एक अल्पशक्तिस्थानांसंबंधी वास्तव आहे.
विपरीत समजुतीतून आलेला मोह आपल्याला अल्पशक्तिमानाचा मोह करायला प्रवृत्त करते. पण हा मोह आपल्याला टाळता आला पाहिजे. याचे कारण असे की, मोह या शक्तिस्थळांची एकच बाजू दाखवतो. अशा शक्तिस्थांनाच्या मोहाने प्रभावित झालेल्या माणसाला त्यांची फक्त उपयुक्ततता दिसते. परंतु त्या उपयुक्ततेला मर्यादा हे मात्र जाणवत नाही. मोहाने माणूस अंध होतो असे जे जाणकार आपले निरीक्षण नोंदवतात ते शतप्रतिशत वस्तुस्थिती आहे असे विचारांती जाणवते. अशावेळी श्रीगुरूप्रदत्त विवेकाचा नेत्र माणसाला सावधानही करतो आणि शक्तिस्थळांची मर्यादाही दाखवतो.
मुळात आपली सर्व जीवन जगण्याची प्रक्रियाच आपला संबंध अल्पशक्तिमानाशी जोडून देते. आपला अल्पशक्तिमानाशी होणारा संबंध एक अटळ गोष्ट आहे. या जगात प्रविष्ट होणे म्हणजे अल्पशक्तींशी संबंधित होणे. जगण्याच्या प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक टप्प्यावर आपण अल्पशक्तिमानाला टाळू शकत नाही. अल्पशक्तींना धरून पुढे पुढे जायचे असा आपला जीवनक्रम आहे. मग त्यांचा आवश्यक तेथे उपयोग तर करायचा पण ते कायम आपल्या नियंत्रणात रहावेत असे समजून त्यांच्यावर स्वामित्व करण्याचा प्रयत्न टाळायचा. त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सफल होणार नाही. भूतकाळात इतिहासजमा सर्व रथी, महारथी, राजे, सरदार, शूरवीर, सेनापती इत्यादिनी आपल्या शरीर आणि मन: सामर्थ्याच्या उपयोग करून अल्पशक्तिमानावर स्वामित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना स्वामित्व तर प्रस्थापित करता आलेच नाही याउलट तेच या जगातून अदृश्य झाले. इतिहास हेच दाखवतो की, जे जे अल्पशक्तिमान आहेत त्यांच्यावर स्वामित्व करण्याचा मोह एक निष्फल गोष्ट आहे. थोडक्यात, अल्पशक्तिमानावर स्वामित्व करण्याचा मोह टाळायचा असेल तर एका संयमाची आवश्यकता असते. तो संयम विवेकानेच येते.
जीवन जगण्याच्या प्रक्रियेत अल्पशक्तिमानाचा संपर्क तर होणारच, त्यांचा आधार सुद्धा स्वीकारावा लागणार हे जरी एक सत्य असले तरी विवेकाने हेही ओळखायचे की, ते एक अल्प सामर्थ्य आहे. तिथे सामर्थ्याची पूर्णता नाही. आपल्याला तर सामर्थ्याची पूर्णता हवी आहे. सामर्थ्याच्या पूर्णतेशिवाय आपले समाधान होणार नाही. मग जे अल्प सामर्थ्य उपलब्ध आहे त्याला उपयोगात आणावे. परंतु ते उपयोगी आहे म्हणून त्याच्यावर नियंत्रण करण्याचा मोह टाळून ते उपयोगी आहे म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञ रहावे. असा अल्पशक्तिमानासंदर्भात संयम आणि कृतज्ञतेचा भाव ठेवावा. असा भाव धारण करण्यासाठी गुरुप्रदत्त विवेकाची कास धरावी. या जगातील वस्तु आणि व्यक्ति मर्यादित सामर्थ्याने युक्त आहेत म्हणून त्यांचा त्याग करावा किंवा द्वेषही करू नये. ती शक्तीस्थाने उपयुक्त आहेत म्हणून त्यांच्यावर स्वामित्वही करू नये. अशा दोन टोकांना टाळून त्यांच्याशी संबंधित होता येते. माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की, एखादी वस्तु किंवा व्यक्ति फार उपयोगी पडत नाही असे लक्षात आले की त्या संदर्भात दोन प्रतिक्रिया संभवतात. फारशी उपयोगी नाही म्हणून एकतर तिचा द्वेष करायचा, त्याग करायचा किंवा तिच्यावर नियंत्रण मिळवून तिची उपयुक्तता वाढविण्याचा असफल प्रयत्न केला जातो. अशा प्रतिक्रिया म्हणजे दोन विरुद्ध टोक आहेत. श्रीगुरूप्रदत्त विवेक व्यक्तिला हेच दाखवतो की, या जगातील वस्तु आणि व्यक्ति एका अल्प शक्तीनेयुक्त आहेत. जितक्या प्रमाणात आपल्याला उपयोगी ठरतात तेवढा त्यांचा उपयोग करून घ्यावा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी कारण त्यांनी आपले जीवन सुसह्य आणि सुलभ करण्यामध्ये मर्यादित प्रमाणात का होईना जे योगदान दिले आहे ते महत्वाचे आहे. मर्यादित शक्तींवर नियंत्रण मिळवून त्यांना अमर्यादित करण्याचा हेतूने जे स्वामित्व केले जाते हा एक असफल प्रयत्न आहे हे विवेकाने ओळखावे. विवेकाने हेही ओळखावे की, आपले मुख्य जीवनोदिष्ट अनंत शक्तीनेयुक्त असलेला परमात्मा आहे. आपले खरे समाधान सामर्थ्याच्या पूर्णतेमध्ये आहे. ते हवे असेल तर अल्पशक्तिमानाजवळ थांबून चालणार नाही. म्हणून अल्पशक्तिमानाचा मोह सोडावा लागेल आणि अनंत शक्तीने युक्त असलेला जो परमात्मा आहे त्याच्याकडे वळावे लागेल. जिथे सामर्थ्याची पूर्णता आहे अशा परमात्म्याकडे गेल्यानेच आपल्याला सुद्धा त्याच्यासारखे अनंतशक्तीने युक्त होता येते अर्थात परमात्मसदृश होता येईल अनुभव अनेक परमार्थ जाणकारांनी दिलेला आहे. त्यापैकी श्रीतुकोबांचे एक सुंदर वचन मला आठवते ते येथे उधृत करतो:
बळियाचे अंकित | आम्ही झालो बलिवंत || श्रीतुकाराम गाथा अभंग क्रमांक 223
संतश्रेष्ठ श्रीतुकोबारायांनीResp Shri Bhalke sir Apnas maza shir sastangNamskar परमात्मसादृश्याचे मर्म ओळखून ते अभंगरूपाने आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे.
 श्री गोंदवलेकर महाराज विचार सौदर्य
lदेहाचा विसर हेच खरे आनंदाचे चिन्ह आहे l
मनुष्य म्हंटला की तो स्वभावतः आनंद शोधणार.
पण मनुष्याचा हा आनंद कायम टिकत नाही आणि त्याचा आनंद हा सारखा बदलत असतो म्हणजे आज एखाद्या गोष्टीपासून आनंद प्राप्त झाला तरी तो काही मर्यादित काळापर्यंत असतो हा अनुभव आपल्याला व्यक्ती आणि वस्तू या दोन्ही पासून मिळतो.
आयुष्यभर प्रयत्न केला तरी देखील समाधान होत नाही व निराशा पदरी पडते.
आपल्या देहाला जे हवे असते ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि येथेच आपली चूक होते.
संतांचे असे सांगणे आहे की आपली देहबुद्धी प्रथम नाहीशी करावी म्हणजेच मला हे पाहिजे किंवा नको हा आग्रह सोडावा म्हणजे हळुहळु ही स्थिती प्राप्त होईल की आपलं मन एकदम शांत होईल आणि मग भगवंताच्या इच्छेने जे प्राप्त होईल त्यातच आपण सुखी राहू हा जो आनंद आहे तोच कायम टिकणारा आहे.
देहबुद्धी ते आत्मबुध्दी करावी सदा संगती सज्जनांची धरावी.
Iजय जय रघुवीर समर्थ l
: *प्रवचनाचे शिर्षक : ●संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो.*
*●●●"प्रत्येकजण भक्ति करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर ●'भक्ति म्हणजे आवड.' ●"परमार्थात भक्ति म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे." ●"सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तिच करीत असतात."●●●*
*●●●"विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढविणारी, आणि स्वार्थी असते." ●'ही कमी झाल्याशिवाय' परमात्म्याची आवड म्हणजे भक्ति उपजणे शक्य नाही."●●●*
*●●●याकरिता भक्ति मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे ●"मोबदल्यारहित, निष्काम, निःस्वार्थी परमात्मस्मरण" करणे, आणि शेवटची पायरी म्हणजे ●"आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धि विगलित होणे", ही होय.●●●*
*●●●"देहरक्षण परमार्थप्राप्तीकरिता करावे." ●केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट ?"●●●*
*●●●"जयंत्यादि उत्सव आपण करतो तो ●'भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे' म्हणून." ●मुळात प्रेम नसेल तर, ज्याच्यावर प्रेम असते ●'त्याला आपण जो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे' असते." ●"प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो." ●"या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो, आणि यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते."●●●*
*●○"आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते." ●●●"भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतःकरताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे ?"●●●*
*●●●"संत विषयात देव पाहतात", पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. ●रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे आम्ही म्हणतो."●●●*
*●●●"आमची वृत्ती विषयाकार बनली, म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो." ●"संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो."●●●*
*●●●"तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात." ●"त्याचा अर्थ, तेरा कोटी जप व्हायला रोज दहा-बारा तास या प्रमाणात जवळ जवळ दहा बारा वर्षे लागतात, इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो."●●●*
*●●●"नाम कधीच वाया जात नाही." ●"केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे; मग ते विषयप्राप्तीकरिता असेल, किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल." ●"विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे."●●●*
*●●●"नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे."●●●*
 *● हरि म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरि नारायणा*
*गोविंद गोपाल हरि नारायणा*
*शाम म्हणा , राधेश्याम म्हणा, घनःश्याम म्हणा, मेघःश्याम म्हणा*
*राम म्हणा, राजाराम म्हणा, सीताराम म्हणा, आत्माराम म्हणा*
*दत्त म्हणा, गुरूदत्त म्हणा, श्रीपाद म्हणा, गुरूदेव म्हणा*
*ईश म्हणा, जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा*
*हरि म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरि नारायणा*
*गोविंद गोपाल हरि नारायणा*
*ऐका हे परमश्रेष्ठ ●हरिभजन, सुमधूर व अत्यंत बहारदार आवाजात आवाजात.*

No comments:

Post a Comment