Followers

Monday, April 13, 2020

श्रीमद्भागवत कथेतील चिंतन 109

🕉---#श्रीमद्भागवत_कथेतील_चिंतन---(109)---🕉
श्रीगुरूमाऊली..👏
श्रीकृष्णकृपां
--------------------🙏 🌷 🕉️ 🌷 🙏---------------------
आता "भगवान द्वारिकेला" जायला निघाले. सगळं त्याठिकाणी सज्ज झालं वातावरण. सर्वजण बोळवण करण्याकरिता आले. अर्जुन भगवंताच्या बरोबर त्याठिकाणी रथात बसून द्वारिकेपर्यंत गेला. द्वारिकेमधे भगवंताच्या त्याठिकाणी सोळा हजार एकशे आट असणाऱ्या बायका, भगवंताची वाटच पाहत होत्या. त्या सगळ्या स्त्रीयांनी एक व्रत धारण केलं होतं, त्याचं नाव आहे "प्रोषित भर्तकी" नावाचं "व्रत". हे प्रोषित भर्तकी नावाचं व्रत म्हणजे का..? पती जर त्याठिकाणी बऱ्याच काळाकरता दूर देशाला जाणार असेल तर स्रीयांनी व्रतस्थ राहिलं पाहिजे. ते व्रत म्हणजे कोणतं असेल तर त्यांनी "समारंभात" जायचं नाही. त्यांनी त्याठिकाणी "अलंकार परिधान" करायचे नाहीत. त्यांनी "गोड-धोड" खायचं नाही. त्यांनी "गावाला शिवाला" जायचं नाही. त्यांनी त्याठिकाणी कोणाच्या "मंगल कार्यात" जायचं नाही. हे व्रत आहे, त्याला प्रोषित भर्तकी नावाच व्रत म्हणतात. जिचा पती दूर देशाला गेलेला आहे तिनं या व्रताला त्याठिकाणी पाळायच आहे.
आता बऱ्याच काळापर्यंत भगवान त्याठिकाणी दूर देशाला गेले होते ना..! म्हणून भगवंताच्या स्त्रियांनी ते व्रत पाळलं होतं. भगवान द्वारिकेमधे जाण्याचा निरोप सर्वांना कळाला. सर्वच भगवंताच्या स्वागताकरीत आले. भगवंतांनी ज्येष्ठ-श्रेष्ठांना नमस्कार केला. समवयस्कांना भगवान भेटले. कनिष्ठांना भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि आता त्याठिकाणी भगवंताच्या स्त्रिया भगवंताचं औक्षण करू लागल्या. त्याचं मुख पाहून सर्वांनी त्याठिकाणी अशा पद्धतीने आपलं व्रत सोडून दिलं आणि मोठ्या आनंदानं "भगवंताचं स्वागत" करू लागले.
...

No comments:

Post a Comment