Followers

Monday, April 20, 2020

abhang



कापुरीं परिमळु दिसे वो अळुमाळु ।
हळू हळू सुढाळू पवनपंथें ॥ १॥
पवनी न माये पवनही धाये।
परतला खाये आपणासी ॥२॥
मुखवात नाही तरतसे बाहीं ।
नांवे दिशा दाही आप घोषें ॥३॥
ज्ञानदेवा मौन्य नामाचे तारण।
तारक हरिवीण दुजा नाहीं॥४॥
★भावपराग★
कापुराच्या ठिकाणी जसा सुगंध किंचित अनुभवाला येतो. तसा परमार्थ मार्गात सुखातील थोडा थोडा आनंद प्रतितीला येतो. प्राणायामाच्या मार्गाने तो अधिक स्पष्ट होऊ लागतो१. तो असा की तो प्राणात न मावता त्या प्राणाचा प्राणपणाच गिळून टाकतो. किंवा आत्मज्ञानाच्या उदयाने तो प्राणच संतुष्ट होतो.आणि आपल्यालाच आपण खाऊन टाकतो२. प्राणाचा मोठेपणा नसला तरी आत्मज्ञानाच्या विचाराने दशदिशा ब्रह्मरुप आहेत असे ओळखून सर्वाचाच तो घोट घेऊन टाकतो. म्हणजे सर्व आत्मरुप आहे असे जाणतो ३. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मला संसारातून तारुन नेणारा एक हरिनाम मंत्रच आहे. दुसरा उपायच नाही. ४.
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment