Followers

Monday, April 13, 2020

संतांशीं शरण

नाहीं संतांशीं शरण ।
काय वाचोनि पुराण ॥
म्हणे विठ्ठलाचा दास ।
देखोनी परनारीस हांसे ॥
करिती विठोबाची भक्ति ।
दयाधर्म नाहीं चित्ती ॥
तेथें नाहीं माझा देव।
व्यर्थ श्रमवी हा जीव ॥
अंगीं नाहीं क्षमा दया ।
म्हणती भेट पंढरीराया ॥
नाहीं धर्माची वासना ।
काय करोनि प्रदक्षिणा ॥
ऐसें नव्हे भक्तिवर्म ।
तेथें नाहीं माझा राम ॥
नये कृपा कांहीं केल्या ।
नये घाम जीव गेल्या ॥
जैसी खड्गाची धार ।
विठ्ठलचरणीं तुका शूर ॥
🙏🌹पांडुरंग हरि 🌹

No comments:

Post a Comment