Followers

Friday, April 17, 2020

BHAGWAT KATHA


श्रीगुरूमाऊली..👏
श्रीकृष्णकृपां
--------------------🙏 🌷 🕉️ 🌷 🙏---------------------



"पांडवांच" स्वर्गारोहण झालं. "राजा परीक्षिती" त्याठिकाणी महाराज राज्य करू लागला. त्याचं राज्य मोठं गुण्यागोविंदान त्याठिकाणी चालू लागलं. हा प्रजेच पुत्रवत पालन करू लागला. मुलासारखं सांभाळतो आहे असा वैभवसंपन्न राजा. त्यानं अनेक अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेध म्हणजे काय माहिती आहेत ना तुम्हाला ? अश्व म्हणजे राष्ट्र आणि मेध म्हणजे उन्नती. राष्ट्राची उन्नती व्हावी याकरिता त्यानं यज्ञ केले. राष्ट्राची उन्नती चार प्रकारान करता आली पाहिजे. "सामाजिक उन्नती" "सांस्कृतिक उन्नती" "आर्थिक उन्नती" आणि "धार्मिक उन्नती" या चार प्रकारची उन्नती झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये स्वस्तिक लावलं जातं ना, स्वस्तिक. त्या स्वस्तिकाला सुद्धा चार टोकं असतात. चार टोकं असतात. चार तोंड असतात ना असे, ते सोईच फिरलं पाहिजे बरं. ते लावतानी किंवा त्याचं चित्र काढताना सोयीचं काढत जावं, नाही त उल्ट जर केलं तर उल्ट होईल. चार प्रकारची उन्नती त्याठिकाणी वर्णन करून सांगितली शास्त्रामधे. सामाजिक उन्नती व्हावी, सांस्कृतिक उन्नती व्हावी, आर्थिक उन्नती व्हावी आणि धार्मिक उन्नती व्हावी आपल्या परिवाराची. म्हणून आपल्या घरामधे स्वस्तिक लावलं पाहिजे. तसं राष्ट्राची उन्नती व्हावी म्हणून तो यज्ञ करतो आहे आणि प्रजेला त्याठिकाणी आपल्या मुला सारखं सांभाळतो आहे असा धर्मात्मा असणारा राजा.
...

No comments:

Post a Comment