Followers

Friday, April 24, 2020

abhang

अळुमाळु सोय रातलीची धाय ।
सत्वतेजीं माये एक तत्त्वीं॥१॥
तें तत्त्वसाधन मुक्तामुक्त धन ।
कृष्ण नाम पूर्ण तेजीं माये ॥२॥
सोकरी पापपुण्या ठायीं आपा ।
आयुष्याच्या मापा हरि धांवे ॥३॥
ज्ञानदेव गीत गातसे नित्य ।
कृष्ण कृष्ण सत्य इतुकें सार ॥४॥
◆भावपराग◆
शुद्ध अंतःकरणात कृष्णाची थोडी जरी प्रेम भक्ती उत्पन्न झाली तरी त्या योगाने परमानंद प्राप्ती होऊन चित्त शांत होते.१ ती भक्तिच तत्वप्राप्तीचे साधन असून ती मुक्त अमुक्त ही दोन्ही धर्म ज्या ठिकाणी नाहीत त्या तेजोरूप परिपूर्ण कृष्ण नामातच एकरूप होते.२ या भक्तिने पाप पुण्याचे पाणी होऊन जाते म्हणजे ती पाप पुण्ये नाहीसी होतात. आणि उरलेल्या आयुष्यामध्ये त्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता श्रीहरि पाठिराखा होऊन राहातो.३ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे कृष्णनामाचे गीत मी लोकांना वारंवार सांगतो. याचे कारण कृष्ण नाम हे खरे सार आहे.४
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*

No comments:

Post a Comment