Followers

Monday, April 13, 2020

*(ज्ञानेश्वरी अध्याय १० ओवी क्रमांक १० ते १४ )*

*श्रीगुरूचें महिमान*
*=============================*
१.गुरुकृपेचे महात्म्य वाणीने वर्णन करता येईल काय?
२.सूर्याला (चकचकीत करण्याकरिता) उटणं लावता येईल काय!?
३.कल्पतरूला फलद्रूप होण्याकरिता मोहोर फुटायला पाहिजे काय?
४.क्षिरसागराला कशाने पाहुणचार करता येईल काय?
५.कापूराला सुगंध आणण्याकरता दुसऱ्या कशाची गरज आहे काय?
६.चंदनाला दुसऱ्या कशाची उटी लावायची गरज आहे काय?
७.अमृताला शिजवायची गरज आहे काय?
८.आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय?
९.आपल्या बुद्धीने श्रीगुरुसामर्थ्य वर्णन करता येईल काय?
१०.मोत्याला( चकाकी येण्याकरिता) पुटं देणे योग्य आहे काय?
११.उत्तम सोन्याचा चांदीचा मुलामा देणे योग्य आहे काय?
*=============================*
*प्रश्न ११ आहेत.*
*११ प्रश्नांच उत्तर एकचआहे!*
*"नाही" हेच उत्तर!*
*=============================*
एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें ।
कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ? ॥ १० ॥
केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? ।
कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ? ॥ ११ ॥
चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें ।
गगनावरी उभवावें । घडे केवीं ? ॥ १२ ॥
तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन ? ।
हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥ १३ ॥
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे ।
तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल ॥ १४ ॥
कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतींचीं बोलणीं ।
उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ १५ ॥
*=============================*
*०५ ओव्यामधून आलेलं हे सुंदर चिंतन!*
*(ज्ञानेश्वरी अध्याय १० ओवी क्रमांक १० ते १४ )*
*=============================*

No comments:

Post a Comment