Followers

Friday, June 8, 2018

Abhang dhara thingi


अभंगधारा १. ठिणगी गाडी वेगानं पळत होती. दिवस गर्दीचे नव्हते. त्यात हा वातानुकूलित डबा. त्यामुळे चौघा मित्रांचा गट सुखावलाच होता. गाडी वेगानं पळत होती. दिवस गर्दीचे नव्हते. त्यात हा वातानुकूलित डबा. त्यामुळे चौघा मित्रांचा गट सुखावलाच होता. चौघांची परिस्थिती, जडणघडण, वृत्ती, स्वभाव तसे भिन्न भिन्न, पण मैत्र पक्कं होतं. चौघांनी ठरवलं होतं, नेहमीच्या धबडग्यातून पंधरा-वीस दिवस स्वत:साठी काढायचे. सुदूर प्रांतात तीर्थयात्रेला जायचं. ही यात्राही होती वेगळीच. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची आवड चौघांनाही होतीच, पण साधनमार्गाबद्दल मतभिन्नता होती. अर्थात दुसऱ्याच्या मताचाही आदर करायचा आणि अनाग्रही पण ज्ञानसंग्राही वृत्तीने  संवाद साधायचा, यावर चौघांचे एकमत असल्यामुळे मतं जुळोत न जुळोत, चौघांची मने जुळत होती. या यात्रेच्या आखणीतही त्याचंच प्रतिबिंब पडलं होतं. प्रवासात आणि यात्रेच्या ठिकाणी आपापल्या परीनं आणि पद्धतीनं उपासना करायची, मौनाचा #अभ्यास करायचा, एकत्रित चिंतन व चर्चा करायची. मन आणि बुद्धीला या खाद्यानं पुष्ट करायचं, असं चौघांनी ठरवलं होतं. त्यामुळे या यात्रेला निश्चित अशी दिशा होती. गाडीनंही जणू त्या दिशेशी सांधा जुळवत रूळ बदलले. बाहेरचं मनोहारी दृश्य गडद काचेतून पाहात योगेंद्राची नजर डब्यात वळली. ज्ञानेंद्र, कर्मेद्र आणि हृदयेंद्र या आपल्या तीन मित्रांकडे त्यानं एक कटाक्ष टाकला. अलगद गप्पा सुरू झाल्या.. योगेंद्र – आपली सामूहिक चिंतनाची कल्पना मला फार आवडली. पण त्या चिंतनाला काही निश्चित आधार हवा ना? काही सूत्र हवं.. ज्ञानेंद्र – सूत्र असलं पाहिजे हे ठीक, पण आपण बरोबर ग्रंथ तरी कुठे घेतलेत? एखादा ग्रंथ असता तर थोडं थोडं वाचून चर्चा करणं सोपं झालं असतं. कर्मेद्र – ग्रंथाचं ओझं हवं कशाला? माझ्याकडे लॅपटॉप आहे. हवे तेवढे ग्रंथ इंटरनेटवरून ऑनलाइन वाचता येतील. योगेंद्र – अरे हो की! पण असं करू, भारंभार शब्द वाचून काय उपयोग? मोठा विस्तव करायला एक ठिणगी पुरी पडते. तसा चिंतनासाठीचा आधार ठिणगीएवढा पुरेल, त्यातून चिंतनाचा वणवा भडकेल. हृदयेंद्र – आणि तो मनातल्या शंका-कुशंका, तर्क जाळून टाकेल! ज्ञानेंद्र – किंवा अधिकच वाढवेलसुद्धा! कर्मेद्र – पण ‘शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट’ असं काय आहे? ज्ञानेंद्र – ‘स्वीट’ नको म्हणूस कारण सत्य ‘स्वीट’ असतंच असं नाही. शॉर्ट बट ग्रेट म्हण.. हृदयेंद्र – मी सुचवू का? आपण अभंग वाचू. थोडक्या शब्दांत किती ज्ञान भरलं असतं त्यात. कर्मेद्र – कल्पना छान आहे, पण आपल्याला भासेल तोच अर्थ खरा असेल का? काहीजण उपहासानं म्हणतात की ज्ञानोबा, तुकोबांनी आपल्या अभंगाचा काय काय अर्थ लोक लावतात हे पाहिलं तर त्यांनाही आश्चर्य वाटेल.. हृदयेंद्र – काही का अर्थ निघेना.. चिंतन तर त्यांचंच होईल. आणि हा अर्थ आपल्यापुरता आहे. जगाला कोण सांगायला जाताय. कर्मेद्र – ठीक. मग अभंग या शब्दापासूनच सुरुवात करू. ज्ञानेंद्र – अरे सर्वानाच माहीत आहे, अभंग म्हणजे कधीही न भंगणारं. हृदयेंद्र – संतांनी अभंगातून आपल्या आत्मिक धाराप्रवाहालाच वाट मोकळी करून दिली आहे. त्यात मनसोक्त डुंबू या. कर्मेद्र – पण कोणता अभंग घेऊया? योगेंद्र – अरे काल मोबाइलवर आपण ऐकला ना? तोच अभंग घेऊ.. ज्ञानेंद्र – एक लक्षात ठेवा. अभंगाचं गाणं होतं ना तेव्हा त्यात किंचित बदलही केला जातो. त्यामुळे आधी मूळ अभंग वाचू, मग हवंतर गाणं ऐकू. हृदयेंद्र – हो बरोबर! पण योगा काल कोणता अभंग ऐकत होतास? कर्मेद्र – ओ! तो.. पैल तो गे काऊ कोकताहे!! थांब लॅपटॉप सुरू करतो आणि मूळ अभंग शोधतो.. तोवर थोडा धीर धरा.. चौघांच्या नजरा लॅपटॉपवर खिळल्या. थोडी शोधाशोध केल्यावर अभंग गवसला. समाधानानं कर्मेद्रनं निश्चिंत सुस्कारा टाकला. कर्मेद्र – ग्रेट! मिळाला ‘पैल तो गे काऊ’! आता वाचून दाखवतो हं.. योगेंद्र – नको! तुझं वाचणं म्हणजे संगणकीय निर्विकार उद्घोषणा. त्यापेक्षा हृदयेंद्रला वाचू दे. कर्मेद्र – ठीक आहे.. एवढं जुनं मराठी मला तरी वाचता येईल का? शंकाच आहे. हृदु तूच वाच.अभंगावर थोडा वेळ नजर टाकत हृदयेंद्र म्हणाला, गाणं आणि मूळ अभंग यात किंचित फरक आहे. या वाक्यानं तिघांचे कान अधिकच सजग झाले!

Sunday, May 13, 2018

संत ज्ञानेश्वरजी


*संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार :-* *१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.* - *संत ज्ञानेश्वर* *२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.* - *संत ज्ञानेश्वर* *३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.* - *संत ज्ञानेश्वर* *४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.* - *संत ज्ञानेश्वर* *५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.* - *संत ज्ञानेश्वर* *६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.* - *संत ज्ञानेश्वर* *७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !* - *संत ज्ञानेश्वर* *८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.* - *संत ज्ञानेश्वर* *९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.* - *संत ज्ञानेश्वर* *१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.* - *संत ज्ञानेश्वर* *🙏🏻 सात्वीक जीवनसारांश आपणांस समर्पीत 🙏🏻*

Friday, May 11, 2018

*अध्यात्म म्हणजे काय* ? *

*अध्यात्म म्हणजे काय* ? * अध्यात्म म्हणजे ईश्वराने माणूस म्हणून जन्म दिला आहे तर, माणसाने माणसांशी माणसांसारखे वागणे आणि, आपली नैतिक जबाबदारी पार पाडणे.* * अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.* * अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.* * अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव असणे.* * अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अस वागणं.* * अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.* * अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रमाणिकपणे करणं.* * अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.* * अध्यात्म म्हणजे मुक्या पशु-पक्ष्यांवर देखील प्रेम करणे* * अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे .* * अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव ठेवणे.* * अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थभाव असणे.* * अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.* *अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सदभाव आणि सतभावाने रहाणे.* * अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.* * अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देण लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता असणें.* * अध्यात्म म्हणजे गरजवंतांना यथा शक्ती मदत करणे.* * अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असणे.* * अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं, आणि वागणं.* * अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चा, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर, अध्यात्म म्हणजे केलेली पूजा, अर्चा, प्रार्थना आणि भक्ती याप्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.* * अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.* *थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने करणे* 🙏🏻🌹🌹🙏🏻